Paithan News : नाथसागर धरणात बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला file photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : नाथसागर धरणात बुडालेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

छत्रपती संभाजीनगर येथून पैठण येथील जायकवाडी धरणात रविवारी (दि.३१) पोहण्यासाठी आलेल्या सात मित्रांपैकी दोन जण बुडाले होते.

पुढारी वृत्तसेवा

Paithan News: Body of the Youth Who Drowned in Nath Sagar Dam Recovered

पैठण, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर येथून पैठण येथील जायकवाडी धरणात रविवारी (दि.३१) पोहण्यासाठी आलेल्या सात मित्रांपैकी दोन जण बुडाले होते. यात एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. सोमवारी (दि.१) सकाळी नऊच्या सुमारास दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधकार्य पथकाला सापडला.

अनिकेत मनू भारती (१९) असे या तरुणाचे नाव आहे. संकेत सिद्धार्थ खरात (१८, दोघेही रा. अंबिकानगर, गल्ली नंबर सात, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) याचा मृतदेह रविवारी सापडला होता.

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरातील सात मित्र रविवारी दुपारी जायकवाडी धरणात पोहण्याचा बेत करून पैठण येथे रिक्षाने आले होते. संकेत खरात व अनिकेत भारती या दोघांना पोहता येत नसतानाही ते इतर तिघा मित्रांसह धरण परिसरातील पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे पाण्यात बुडाल्याचे इतर मित्रांच्या लक्षात आल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.

माहिती मिळाल्यावर पैठण पोलिस, अग्निशामक दल व युवकांच्या पथकाने पाण्यामध्ये शोध सुरू केला. काही वेळानंतर संकेत खरातचा मृतदेह सापडला होता. परंतु अनिकेत भारतीचा शोध लागला नव्हता. अंधार झाल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली होती.

सोमवारी सकाळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैभव सारंग, बीट जमादार राजेंद्र जिवडे, पालवे, चव्हाण व नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान, पथकातील अमोल शेजुळ, जब्बी धांडे, अनिल गायकवाड, ईश्वर मिसाळ, आकाश जगधने, रफिक धांडे, जफर शेख, शुभम रूपेकर, सुधीर नलभे यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. नऊ वाजेदरम्यान अनिकेत भारतीचा मृतदेह आढळून आला-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT