पैठण :- पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नायगाव - खांडेवाडीला गुरुवारी दि.१० रोजी दुपारी अतुल सावे यांचे ज्येष्ठ बंधू अजित मोरेश्वर सावे व पुतण्या अमेय अजित सावे रा. खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर यांना रस्त्याच्या वादातून नायगाव -खांडेवाडी ता. पैठण येथील गावातल्या एका गटाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
अधिक माहिती अशी की राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या मालकीची शेती जमीन तालुक्यातील नायगाव -खंडेवाडी शिवारात आहे. या शेती लगत येण्या जाण्यासाठी जुना रस्ता आहे. अशी येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. हा रस्ता बंद केल्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसापासून नायगाव - खंडेवाडी येथील गावकरी यांच्यासोबत वाद सुरू होता. आज गावकरी व सहकार मंत्री अतुल सावे यांची मोठे बंधू अजित मोरेश्वर सावे व पुतण्या अमेय अजित सावे यांचा गावकऱ्याशी रस्त्यावरून वाद झाला यावेळी गावातल्या एका गटाने या दोघांना मारहाण केली.
या घटनेमुळे नायगाव- खंडेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने. या गावाला पोळ्याच्या सणाच्या दिवशी छावणीचे स्वरूप निर्माण होऊन गावात तणावग्रस्त परिस्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सदरील प्रकाराची माहिती मिळतात पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळ धाव घेतली असून. यासंदर्भात बिडकीन पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झालेली नव्हती.