Sand Mining File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sand smuggling : पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक तस्करांवर एलसीबीची कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोहगाव येथे परिसरात कारवाई, वाळू तस्करांचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव येथे अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर शनिवारी (दि.१९) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत हायवा वाहनासह एकूण १५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पैठण तालुक्यातील विविध भागांत अवैध वाळू आणि मुरूम तस्करांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. या अनधिकृत वाहनांच्या सुसाट वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी अवैध वाळू-मुरूम वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड व भागिनाथ आहेर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी लोहगाव परिसरात गस्त घातली. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या 'हायवा' वाहनाची (क्र. MH 20 GZ 8391) तपासणी केली असता, त्यात दोन ब्रास अवैध वाळू आढळून आली.

याप्रकरणी वाहन मालक व चालक सोनाजी शहादेव शिंदे (रा. लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे हायवा वाहन आणि १० हजार रुपयांची २ ब्रास वाळू, असा एकूण १५ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT