Paithan Sand Smuggling 
छत्रपती संभाजीनगर

Paithan Sand Smuggling: हिरडपुरीत गोदावरीतून अवैध वाळू उपसा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचोड पोलिसांची कारवाई; दोन ब्रास वाळूसह मिनी हायवा ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पैठण : पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर पाचोड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत दोन ब्रास वाळूसह विना क्रमांकाची पिवळ्या रंगाची टाटा मिनी हायवा असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ६ रोजी पाचोड पोलिसांचे पथक पारुंडी शिवारातील गट क्रमांक ७३ लगतच्या रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी राहुल गंगाराम कुऱ्हाडे, सोहेल अन्वर शेख आणि गौरव विनोद डुकळे हे विना क्रमांकाच्या टाटा मिनी हायवामधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले. पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार साबळे, सानप आणि आयनले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चौकशीत सदर मिनी हायवा गणेश भागाजी डुकळे यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. तसेच संदीप छबुराव डुकळे यांच्या सांगण्यावरून हिरडपुरी येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी पाचोड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध कारवाई करत दोन ब्रास वाळूसह मिनी हायवा असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पाचोड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT