Sambhajinagar Census : शहरात १ मेपासून सुरू होणार जनगणना Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Census-2027 : जनगणनेला प्रतिसाद; ३ दिवसांत १० हजारांहून अधिक स्वयं-नोंदणी

जनगणना-२०२७ उपक्रमाच्या सुरुवातीलाच शहरात नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Overwhelming Response to Census: More Than 10,000 Self-Registrations in Three Days

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा। जनगणना-२०२७ उपक्रमाच्या सुरुवातीलाच शहरात नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसांत १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्वत हुन नोंदणी करत सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी ७,६११ नागरिकांनी आपली माहिती पूर्ण भरून प्रक्रिया पूर्ण केली असून, डिजिटल पद्धतीने मिव्यतेला हा प्रतिसाद प्रशासनासाठी समाधानकारक ठरत आहे. महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

नागरिकांना मोबाईल अॅप आणि ऑनलाईन पोर्टलच्या सहास्याने स्वतःची माहिती नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.

शहरात मोहिमेच्या पहिल्याच दिवशी, १ मे रोजी, २,९८५ नागरिकांनी स्वयं-नोंदणीस सुरुवात केली होती. त्यापैकी २.१८२ जणांनी प्रक्रिया पूर्ण केली, तर उर्वरितांची नोंदणी सुरू होती. पुढील दोन दिवसांत प्रतिसादात लक्षणीय वाढ होत नोंदणीचा आकडा १०,०७९ पर्यंत पोहोचला. यामध्ये अजूनही २.४६८ नागरिकांची नोंदणी प्रक्रिया प्रलंबित असल्याचे दिसून येते आहे. स्वयं-नोंदणीचा प्रारंभीचा पहिला टप्पा १५ मेपर्यंत चालणार आहे, त्यानंतर १६ मेपासून दुसन्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कामासाठी नियोजनावर भर

गोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शहराचे १० स्वतंत्र भागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक भागात सुमारे १२० ते १४) घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला निश्चित कार्यक्षेत्र निळून कामाची गती आणि अचूकता वाढण्यास मदत होणार आहे.

नागरिकांचे सहकार्य आवश्यक जनगणना प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी बागरिकांनी स्वयं-बांदणी करताना अचूक माहिती भरावी, तसेच पडताळणीदरम्यान सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या मोहिमेच्या यशासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण

जनगणना मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ राज्ज करण्यात आले आहे. सुमारे ३,५00 कर्मचान्यांची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त १० टक्के मनुष्यबळ रास्बीव ठेवण्यात आले आहे. त्यानुसार ३,७०० ते ३,८०० कर्मचाप्यांची नियुक्ती केली जाणार असून, यात शिक्षक, महापालिका कर्मचारी आणि विविध शासकीय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT