छत्रपती संभाजीनगर

Farmer Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेचा सव्वा लाखांवर शेतकऱ्यांना लाभ

मराठवाड्यात १२.८० लाख अर्ज अपलोड, ८९९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पुढारी वृत्तसेवा

Over 1.25 lakh farmers benefit from the loan waiver scheme

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पहिल्या टप्प्याच्या यादीतील ४ लाख ६९ हजार ७२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहेत. त्यानुसार १ लाख ३२ हजार ३३३ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ८९९ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभमिळाल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे.

मराठवाड्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभपात्र शेतकऱ्यांना तातडीने देण्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून सतत पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत विभागात पहिल्या टप्प्यात १२ लाख ८० हजार ७८४ शेतकऱ्यांनी पार्टलवर माहिती अपलोड केली. त्यापैकी ६ लाख २६ हजार ३५१ शेतकरी कर्जमुक्त्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

त्यातील ४ लाख ६९ हजार ७२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणासह केवायसीचे काम पूर्ण झाले आहेत. कर्जमाफी त्यापैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार ३३३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकला आहे. दरम्यान, या कर्जमुक्तीसाठी १ एप्रिल २०१९ ते मार्च २०२५ पर्यंत खातेदार शेतकरी पात्र आहेत. २ लाखांवर ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज आहे, त्यासाठी वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) केले जाणार आहे. परंतु, त्यावरील शिल्लक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत बँकेला अदा करावे लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अलीकडेच कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. महायुतीने निवडणूक जाहिर नाम्यात त्यासंबंधीचे आश्वासनही दिले होते.

जिल्हानिहाय आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर: १०३८८७ पैकी ८१५०२ शेतकऱ्यांची केवायसी झाली.

तर ३५५४० शेतकऱ्यांना २३१ कोटींची कर्जमुक्ती मिळाली.

जालना : १०६०४७ पैकी ७८२४६ शेतकऱ्यांची केवायसी झाले.

तर १८७९२ शेतकऱ्यांना ११६ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला,

परभणी : ७८२७८ पात्रपैकी ५५२८८ शेतकऱ्यांचे केवायसी झाले

तर ७८७० शेतकऱ्यांना ६० कोटींचा लाभ मिळाला.

हिंगोली : पात्र ४३५४१ पैकी ३३७३९ शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली.

तर ८९१५ जणांना २९.४५ कोटींचा लाभ मिळाला.

लातूर : ५४३८८ पैकी ४१२२२ शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली.

तर २२९६३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष १५९.९५ कोटींचा लाभ मिळाला.

नांदेड : पात्र ९६७७२ पैकी ६९६४९ शेतकऱ्यांची केवायसी झाली.

त्यापैकी १२९२९ शेतकऱ्यांना १०६.२५ कोटींचा लाभ मिळाला.

बीड : पात्र ९६५२३ शेतकऱ्यांपैकी ७२८८१ जणांची केवायसी पूर्ण झाली असून

१३११० शेतकऱ्यांना ९०.७५ कोटींची कर्जमुक्ती मिळाली.

धाराशिव : ४६९१५ पात्र पैकी ३७२०० शेतकऱ्यांची केवायसी झाली.

तर १२२१४ शेतकऱ्यांना १०५.८६ कोटींची कर्जमुक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT