Crime News : महिलांना कामावरून काढल्याने हेड पोस्ट ऑफिसमध्ये राडा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : महिलांना कामावरून काढल्याने हेड पोस्ट ऑफिसमध्ये राडा

डेप्युटी मॅनेजरचे फोडले नाक; दीड लाखाची मागणी केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Outcry at Head Post Office over women being fired

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरातील जुना बाजार येथील हेड पोस्ट ऑफिसमध्ये (बीपीसी) रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या कारणावरून पोस्टापासून काही अंतरावर भररस्त्यात चांगलाच राडा झाला. या वादातून एका गटाने थेट डेप्युटी मॅनेजरच्या नाकावर कडे मारून त्यांचे नाक फोडले. तर दुसऱ्या गटाने, कामावर राहायचे असेल तर दीड लाख रुपये द्या अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप करत विनयभंगाची तक्रार दिली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भररस्त्यात डेप्युटी मॅनेजरचे नाक फोडले

याप्रकरणी पोस्टल असिस्टंट (बीपीसी) भरत अण्णासाहेब गुंजवटे (४३, रा. म्हाडा कॉलनी, पहिली घटना देवळाई) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी (दि. ५) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास हेड पोस्ट ऑफिसमध्ये कामकाज सुरू असताना, सहा. पोस्ट मास्टर अनिल वारुळे यांनी रोजंदारीवरील दोन महिला कर्मचाऱ्यांना कामाचा भार कमी झाल्याने उद्यापासून कामावर येऊ नका असे सांगितले. याचा राग आल्याने त्या महिलांनी दीड लाख रुपये घेतले असा आरोप करत व्हिडिओ शूटिंग सुरू करून वाद घातला.

सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास भरत गुंजवटे आणि अनिल वारुळे कारने घरी जात असताना, नई बस्ती (बुढी लाईन) जवळ मुन्ना भावस्कर आणि एका अनोळखी व्यक्तीने दुचाकी आडवी लावून त्यांची कार अडवली. तुम्ही महिलांसोबत का वाद घातला, असे म्हणत मुन्नाने गुंजवटे यांना कारबाहेर ओढून शिवीगाळ केली. वारुळे यांनाही शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, मदत करण्यासाठी पोस्टाचे डेप्युटी मॅनेजर रणजित पाटील तिथे आले असता, मुन्नाने हातातील कडे त्यांच्या नाकावर मारून रक्त काढले. या मारहाण आणि जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दोन महिला, मुन्ना भावस्कर (सर्व रा. भावसिंगपुरा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्लील नजरेने पाहिले अन् दीड लाख मागितले

दुसऱ्या गटाकडून एका ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी ६ दुसरी घटना वाजता ड्युटी संपवून घरी जात असताना, बीपीसी मॅनेजर अनिल वारुळे, क्लर्क मॅनेजर भरत गुंजवटे, पाटील सर आणि हरिप्रसाद सर यांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना थांबवले. हरिप्रसाद सरांच्या आदेशाने थांबवले आहे. जॉबला थांबायचे असेल तर दीड लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. नाहीतर आमची वेगळी व्यवस्था करा असे म्हणत अश्लील नजरेने पाहिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

जेव्हा महिलांनी या प्रकाराचे मोबाईलवर शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हरिप्रसाद सर यांनी हात धरून ढकलून कलून दिले आणि पोस्ट ऑफिसचे लाईट बंद केले. त्यानंतर ड्युटी संपवून महापालिकेकडे पायी जात असताना, नई बस्ती (बुढी लाईन) जवळ सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास अनिल वारुळे, भरत गुंजवटे आणि पाटील सर यांनी येऊन महिलांना व त्यांना घेण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून अनिल वारुळे, भरत गुंजवटे, पाटील सर आणि हरिप्रसाद सर यांच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास उपनिरीक्षक संतोष खरात आणि अंमलदार आहेरकर हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT