Online money was stolen by showing off the fear of a chopper
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाला चॉपरचा धाक दाखवून त्याच्याकडून ऑनलाईन सहा हजार रुपये घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि.३) सकाळी आठच्या सुमारास पुंडलिकनगर भागातील भारतनगरात घडली. साईनाथ ऊर्फ पिण्या गणेश खडके (२२, रा. भारतनगर, गारखेडा) आणि गुलाम हारून रसूल शेख अशी आरोपींची नावे आहेत. खडकेला चाकू बाळगताना वाहतूक पोलिसांनी न्यायालयासमोर दुपारी पकडले होते. तर गुलामलाही पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
फिर्यादी ओंकार बाबासाहेब शिंदे (२५, रा. गुरुदत्तनगर, गारखेडा परिसर) हा एका फार्मा कंपनीत एमआर म्हणून काम करतो. सोमवारी (दि. २) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारगिल मैदान येथे तो आणि त्याचे मित्र अथर्व कोटेकर, आदित्य बोलत बसलेले होते. तिथे आर-बळजबरीने ोपी हारुण शेख आणि पिण्या खडके बसलेले होते.
खडकेने ओंकारकडे त्याची मोपेड मागितली. नकार दिल्याने उद्या तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन दोघे निघून गेले. सकाळी ओंकारला पिण्या आणि हारुणने गाठले. पिण्याने कमरेचा चॉपर काढून आम्हाला दहा हजार रुपये दे नाही तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली.
ओंकारने घाबरून पिण्याने दिलेल्या स्कॅनरवर पाच हजार पाठवले. त्यानंतर हारुणने मलाही ३ हजार रुपये पाठव, असे म्हणत धमकवल्याने त्यालाही १ हजार पाठवले. ओंकार घरी गेल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास हारुण पुन्हा त्याच्या घरी जाऊन ७ हजारांची मागणी करत मारहाण केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.