घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या File photos
छत्रपती संभाजीनगर

House burglary : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बेड्या

चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोडेगावात घरफोडी करून सव्वालाखाचे दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (दि. २६) शहागड येथे करण्यात आली. अरुण ऊर्फ आवड्या अभिमान काळे (२५, रा. पारनेर, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोडेगाव येथे सोमनाथ हुलसार यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून प्रवेश केला होता. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अरुण ऊर्फ आवड्या काळे याचे नाव समोर आले. २६ जानेवारी रोजी आरोपी शहागड येथील जुन्या पुलावरून गावात येत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक महेश घुगे, अंमलदार काशीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमाळे, जीवन घोलप, फिंगरप्रिंट विभागाचे सपोनि पठाण, परमेश्वर आडे यांच्या पथकाने केली.

दोन गुन्ह्यांची कबुली; मुद्देमाल जप्त पोलिसी खाक्या दाखवताच अरुण काळेने खोडेगाव येथील घरफोडीसोबतच त्याच दिवशी (दि.२२) पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होणोबाची वाडी येथेही दिवसाढवळ्या घरफोडी केल्याची कबुली दिली.

गोंधळाच्या कार्यक्रमात उडविले पैसे

काळे याने चोरलेले दागिने शहागड येथील एका सोनाराला विकले होते. पोलिसांनी त्या सोनाराकडून १६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ५ हजार रुपये असा २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीच्या पैशातून काळेने गोंधळाच्या कार्यक्रमात मोठी रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT