छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : हज हाऊसमध्ये वक्फ बोर्डचे कार्यालय नको

एमआयएमचा विरोध, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर यांचे सीईओंना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

No Waqf Board office in Hajj House

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: हज हाऊसमध्ये महारष्ट्र वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येऊ नये. हे कार्यालय पाणचक्कीच्या इमारतीमध्येच ठेवावे, या मागणीचे निवेदन गुरुवारी (दि.२५) महापालिकेतील एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजेद यांनी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फय्याज खान यांना दिले.

यावेळी वक्फ बोर्डाचे संचालक समीर काझी, यांच्यासह आठ सदस्य, एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान, ओसामा कदीर मौलाना, अकिल, शेख अहेमद यांच्यासह सर्व नगरसेवक हज हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते समीर साजेद यांनी ठामपणे वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यास नकार दर्शविला. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या कार्यालयातील एकही फाईल, फर्निचर अथवा कोणतीही प्रशासकीय सामग्री हलविण्यात येऊ नये.

हज हाऊसचा मूळ उद्देश हा केवळ हज यात्रेकरूंच्या सेवेसाठी असून त्याचे कोणत्याही परिस्थितीत कार्यालयात रूपांतर होऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. संपूर्ण मराठवाड्यातील मुस्लिम समाजाने अनेक वर्षांचा संघर्ष, पाठपुरावा आणि आंदोलन करून हज हाऊसची उभारणी केली आहे. त्यामुळे हज हाऊसवर कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अतिक्रमणाचा प्रयत्न समाज सहन करणार नाही.

या इमरतीमध्ये विद्यार्थना अनेक स्पर्धात्मक परीक्षाच्या अभ्यासकरम घेण्याचे सूचवीले यावेळी त्यांनी वक्फ बोर्डाकडे उपलब्ध असलेल्या पर्यायी जागांचा उल्लेख करत जालना रोडवरील वक्फ मालमत्ता, शॉपिंग सेंटर, मॉलच्या जागा, स्मार्ट सिटी कार्यालय, छावणीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची इमारत या वक्फ मालमत्तांमध्ये कार्यालय स्थलांतर करावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT