Sugar Price Hike : शहरात नाही साखरेचा तुटवडा, मात्र दरवाढीमुळे मागणी घटली pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sugar Price Hike : शहरात नाही साखरेचा तुटवडा, मात्र दरवाढीमुळे मागणी घटली

राज्यात साखरेच्या दरवाढीसोबतच तुटवडा निर्माण झाल्याने साठेबाजी रोखण्यासाठी धाडसत्रही सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

No sugar shortage in the city, but demand has dropped due to price hikes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात साखरेच्या दरवाढीसोबतच तुटवडा निर्माण झाल्याने साठेबाजी रोखण्यासाठी धाडसत्रही सुरू आहे. मात्र, शहरात साखरेची कोणतीही कमतरता नसल्याचे जुना मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. शहराला दररोज लागते त्यापेक्षा मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध आहे. मात्र, दरवाढीमुळे काही प्रमाणात विक्रीवर परिणाम झाल्याचे घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज्यात अनेक जिल्ह्यात साखर कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन काही व्यापारी साठवणूक करीत असल्याची चर्चा असली, तरी शहरात कोणी साखरेची साठेबाजी करत नसल्याचा दावाही व्यापाऱ्यांनी केला.

साखरेचा पुरवठा सुरळीत असला तरी विक्रीमध्ये काहीशी घट झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी एका व्यापाऱ्याकडे दिवसभरात सरासरी दोन ते चार कट्टे साखरेची विक्री होत होती. आता ही विक्री साधारण दोन कट्टयांपर्यंत आली आहे. ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याने विक्रीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गरजेनुसारच साखर खरेदी

दोन महिन्यात साखर ५० रुपयांवर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयापर्यंत पोहचली आहे. मात्र, शहरात साखरेचा पुरवठा सुरळीत असल्याने तुटवड्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी गरजेनुसारच साखर खरेदी करावी, असे आवाहन घाऊक व्यापारी अमित पाटणी यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT