No farmer will be deprived in the Panchnama : MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वेदना, आक्रोश आणि जीवनमरणाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२९) तहसिल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे स्पष्ट आदेश दिले. एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, कोणताही अधिकारी हलगर्जीपणा करणार असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पंचनामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशमहसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना शेताच्या बांधावर व घरांच्या अवशेषांवर जावून नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश देताना आ. सत्तार म्हणाले ड्डू ङ्गङ्खवाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घ्या, नुकसानग्रस्तांच्या घरोघरी जाऊन त्यांना धीर द्या. पंचनाम्यांत कोणताही शेतकरी मागे राहू नये. फ्फ मच्छिमार बांधवांच्या नुकसानीकडेही लक्षअतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर मच्छिमार बांधवांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी सिंचन प्रकल्प विभागांना मच्छिमारांचे पंचनामे करून आयुक्त मत्स्यव्यवसाय, जिल्हाधिकारी व प्रादेशिक अधिकारी यांना अहवाल देण्याचे निर्देश दिले.
तालुक्यातील आमठाणा, अंभई, बोरगाव बाजार, अजिंठा, गोळेगाव, निल्लोड, भराडी, पालोद, अंधारी यांसह जवळपास सर्वच मंडळे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. ङ्गङ्घशेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आ-लेला घास निसर्गान हिसकावला आहे; दोन वेळच्या भाकरीसाठी जगाला पो-सणारा शेतकरी आज उपासमारीच्या संकटात रस्त्यावर उभा आहे, फ्फ अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, पोलिस निरीक्षक शेषराव उदार, कृषी अधिकारी संदीप जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजयकुमार सोनवणे, वीज वितरण विभागाचे प्रदीप काळे, जलसंधारणाचे राजधर दांडगे, रुचिता घोगरे आदी उपस्थित होते.
तहसीलदारांनी दर तीन दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन ग्रामपंचायतीवर यादी जाहीर करावी. ग्रामसेवकांनी तात्काळ अहवाल द्यावा; कुचकामीपणा केल्यास निलंबनाची कारवाई होईल, अशी सूचना गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. तर पाझर तलाव, साठवण तलाव व धरण प्रकल्प पोखरल्याने आणखी नुकसान टळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. योग्य माहिती द्या. वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करा. गैरजबाबदारी व राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला.