Ninety percent of lumps in the thyroid gland are harmless
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सुमारे ९० पेक्षा जास्त थायरॉईड नोड्युल्स (थायरॉईड ग्रंथीमधील गाठी) हे साधे आणि ते पूर्णपणे निरूपद्रवी असतात. फक्त काही मोजक्या कॅन्सरचे असू शकतात. असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. स्नेहा डोंगरदिवे यांनी सांगितले. गळ्यात गाठ आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करून घ्याव्यात, असेही नमूद केले.
स्नेहा डोंगरदिवे केसेसमध्ये ते दरवर्षी २५ मे हा दिवस जागतिक थायरॉईड दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना थायरॉईड आणि पोषण ही आहे. थायरॉईड नोड्यूल म्हणजे काय ? याबाबत डॉ. स्नेहा डोंगरदिवे पुढे म्हणाल्या, थायरॉईड नोड्यूल म्हणजे गळ्याच्या पुढच्या भागात असलेल्या, फुलपाखराच्या आकाराच्या थायरॉईड ग्रंथीमध्ये निर्माण होणाऱ्या गाठी किंवा असामान्य सूज होय.
गाठींचे प्रकार सिंगल किंवा मल्टिपल असू शकतात. तसेच त्या घन किंवा द्रवाने भरलेल्या असू शकतात. सर्वच थायरॉईड गाठींवर तातडीने ऑपरेशनची गरज नसते. उपचार हे गाठीच्या प्रकारावर अवलंबून असतात. गाठ साधी आणि लहान असल्यास दर ६ ते १२ महिन्यांनी सोनोग्राफी करून गाठीच्या आकारावर लक्ष ठेवले जाते. हार्मोनची पातळी संतुलित करण्यासाठी योग्य गोळ्या दिल्या जातात.
थायरॉईडची मुख्य लक्षणे
बहुतेक रुग्णांमध्ये गाठी लहान असल्यामुळे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्या शारीरिक तपासणीत किंवा सोनोग्राफीमध्ये आढळून येतात. परंतु गाठ मोठी झाल्यास मानेच्या पुढच्या भागात ढेकूळ, गाठ किंवा सूज दिसणे. अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होणे, श्वास घेण्यास अडथळा येणे, आवाजात बदल होणे, अचानक वजन कमी होणे, छातीत धडधडणे आणि जास्त घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
आवश्यक चाचण्या जागतिक थायरॉईड दिन
डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईड ब्लड टेस्ट, गळ्याची सोनोग्राफी, गाठ साधी आहे की कॅन्सरची हे तपासण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे.
औषधोपचारानेही हार्मोनची पातळी संतुलित पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईडचे रुग्ण अधिक असतात. यात थायरॉईड कधी हार्मोन्सचे खूप जास्त किंवा खूप कमी उत्पादन करतात. परिणामी, असंतुलन निर्माण होऊन नोड्युल्स, गाठी तयार होतात. या बहुतांशी निरुपद्रवी असल्याने शस्त्रक्रियेची कमी गरज पडते. औषधोपचारानेही हार्मोनची पातळी संतुलित होऊ शकते.-डॉ. शरद शेळके, ईएनटी तज्ज्ञ, मेडीकव्हर हॉस्पिटल