छत्रपती संभाजीनगर

Nathsagar dam drowning incident| दुसऱ्याही तरुणाचा मृतदेह सापडला; मुकुंदवाडीतील कुटुंबाचा आक्रोश

बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोध कार्य चालू असताना रविवारी सायंकाळी (दि.31 मे) अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती

पुढारी वृत्तसेवा

पैठण : येथील नाथसागर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या दोन तरुणाचा रविवारी दि.३१ रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटना घडल्याच्या काही तासाने पैठण पोलीस ,अग्निशामक दल व युवकाच्या पथकाने पाण्यामध्ये शोध कार्य करून संकेत सिद्धार्थ खरात (वय : १८ वर्ष) याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता. परंतु यावेळी बुडालेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह शोध कार्य चालू असताना अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती.

सोमवारी (दि.१ जून) सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, बीट जमादार राजेंद्र जिवडे, पालवे, चव्हाण व नगरपरिषद अग्निशमन दलाचे जवान पथकातील अमोल शेजुळ,जब्बी धांडे,अनिल गायकवाड, ईश्वर मिसाळ,आकाश जगधने,रफीक धांडे,जफर शेख,शुभम रुपेकर,सुधीर नलभे यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी पाण्यामध्ये नऊ वाजेच्या दरम्यान शोध कार्य करताना पाण्यात बुडालेला दुसरा तरुण अनिकेत मनू भारती (वय : १९ वर्ष, रा. अंबिकानगर, छत्रपती संभाजीनगर) याचा मृतदेह आढळून आला. सदरील तरुणाचा मृतदेह पैठण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन नेण्यात आला. या तरुणाचे नातेवाईक रात्रीपासूनच नाथसागर धरणावर दाखल होऊन आक्रोश करीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT