Nathsagar Dam news Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Nathsagar Dam News: नाथसागर धरणाचे १८ दरवाजे उघडले, गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

Nathsagar Dam gates open latest news: गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने प्रशासनाने काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

पुढारी वृत्तसेवा

पैठण: नाशिकसह पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून पाण्याची मोठी आवक सुरू झाल्याने, पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी (नाथसागर) धरणाचे १८ दरवाजे आज दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. यामधून गोदावरी नदीच्या पात्रात तब्बल २८,२९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विसर्गाचा निर्णय का घ्यावा लागला?

बुधवारी मध्यरात्रीपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, विशेषतः नाशिक आणि भंडारदरा धरणांमधून, पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. यामुळे नाथसागर धरणाची पाणीपातळी वेगाने वाढत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि धरणाच्या नऊ आपत्कालीन दरवाजांवरून पाणी वाहू लागल्याने, पाटबंधारे विभागाने तातडीने नियंत्रित विसर्गाचा निर्णय घेतला. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत आणि धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. "वरच्या धरणांमधून पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास, परिस्थितीनुसार आपत्कालीन दरवाजेही उघडावे लागतील," अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार ज्योती पवार आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीचे उपाय योजले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी गावांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या गावांमध्ये मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि पोलिसांची पथके तैनात करण्यात आली असून, नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT