नांदेड विभागाची तिकीट तपासणीत भरारी File Photo
छत्रपती संभाजीनगर

नांदेड विभागाची तिकीट तपासणीत भरारी

वर्षभरात सुमारे १५ कोटींचा महसूल वसूल

पुढारी वृत्तसेवा

Nanded Division Soars in Ticket Inspection

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिकीट तपासणी महसूलामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत रेल्वे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल वसूल केला आहे. या वर्षभराच्या काळात तिकीट तपासणीतून सुमारे १४ कोटी ९५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान, रेल्वे गाड्या व स्थानकांवर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमधून विभागाने १४.९५ कोटी महसूल प्राप्त केला कोटीच्या आहे. ही रक्कम मुख्यालयाने दिलेल्या १४.८० उद्दिष्टापेक्षा जास्त असून, आर्थिक वर्ष संपण्यास तीन दिवस शिल्लक असताना म्हणजेच २८ मार्च रोजीच हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.

सध्याची कामगिरी ही आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोंदवलेल्या १२.५९ कोटी या मागील सर्वोत्तम महसुलापेक्षाही अधिक आहे. ही कामगिरी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शक्य झाली असून, अनियमित प्रवास, विनातिकीट प्रवास आदींवर प्रभावी नियंत्रण ठेवल्यामुळे रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवण्यात यश मिळाले आहे. या कामगिरीबद्दल नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी वाणिज्य विभाग आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT