Municipal Election : आयोगाकडून मनपाला मिळाले ४ हजार बॅलेट युनिट File Photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal Election : आयोगाकडून मनपाला मिळाले ४ हजार बॅलेट युनिट

२ हजार कंट्रोल युनिटही प्राप्त : प्रशासन मतदारांना दाखवणार प्रात्यक्षिक

पुढारी वृत्तसेवा

Municipal Election: The commission has provided 4,000 ballot units to the municipal corporation.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज मंगळवारी (दि.३०) शेवटचा दिवस असून, त्यानंतर मनपा प्रशासनाला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मनपाला नुकतेच चार हजार बॅलेट युनिट (बिएलयू) आणि दोन हजार कंट्रोल युनिट (सीएलयू) प्राप्त झाले आहेत, अशी माहिती मनपा प्रशासक तथा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

महापालिकेसाठी शहरात २९ प्रभाग असून, त्यातील ११५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. नऊ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात आले असून, निवडणुकीच्या अनुषंगाने ३ जानेवारी रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ रोजी मतमोजणी होणार आहे.

त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मनपाला ४ हजार बॅलेट युनिट आणि २ हजार कंट्रोल युनिट मिळाले आहेत. हे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटमधील डाटा रिकामा करण्याचे काम (एफएलसी) हाती घेण्यात आले आहे. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट मतदारांपर्यंत घेऊन जाणार असून, त्यावर मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT