छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: महापालिकेने रस्त्यांच्या रुंदीकरणाआड येणारी बेकायदा बांधकामे पाडली आहेत. या कारवाईमुळे शहरवासीयांनाच सुसज्ज रस्ते उपलब्ध होणार आहेत. या मोहिमेतील बाधित मालमत्ताधारक मागेल, त्या स्वरुपात महापालिका त्यांना मोबदला देईल. परंतु, त्यासाठी अगोदर प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन शनिवारी (दि. ३०) पडेगाव, मिटमिटा रस्त्याच्या पाहणी-वेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी नागरिकांना दिले.
शहरातील मिटमिटा येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शनिवारी मिटमिटा येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रथम पाडापाडी झालेल्या भागाची पाहणी केली.
त्यानंतर आयोजित बैठकीत दाखल झाले. यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना देत म्हणाले की, तुम्हालाच सुसज्ज रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ही पाडापाडी केली आहे. विकास आर- ाखड्यात मंजूर असलेल्या रस्त्यामध्ये जी बेकायदा बांधकाम तयार करण्यात आली होती. तीच महापालिकेने जमीनदोस्त केली आहेत. यातील बाधित मालमत्ताध ारकांना आता रीतसर भूसंपादनावेळी मोबदला देण्यात येईल. यात आर्थिक मोबदल्यासह टीडीआर, एफएसआय यासह फ्लॅट, आवास योजनेचा लाभदेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.
यावेळी या भागातील अनेक नागरिकांनी महानगरपालिकेच्या सेवासुविधांबात प्रशासकांपुढे समस्या मांडल्या. त्यासर्व तक्रारींचे निराकरण त्यांनी केले. यावेळी बैठकीला झोन अधिकारी सविता सोनवणे, माजी नगरसेवक सुभाष शेजवळ, सलिम पटेल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या भागात गुंठेवारीचा कॅम्प लावा
पाडापाडीनंतर ज्या मालमत्ताध-ारकांनी अद्याप गुंठेवारी केली नाही. त्यांच्यासाठी तातडीने मिटमिटा पडेगाव भागात कॅम्प लावावा. या कॅम्पमध्ये मालमत्ता कराबाबतही शिबीर आयोजित करावा, असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.