Solar Project : मनपा उभारणार ३० मेगाव्हॅटचा सोलार प्रकल्प File Photo
छत्रपती संभाजीनगर

Solar Project : मनपा उभारणार ३० मेगाव्हॅटचा सोलार प्रकल्प

आयुक्त येडगे यांची माहिती, मंत्री सावे यांनी दिले प्रस्तावाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation to set up 30 MW solar project.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासन शक्य तेवढे कार्यालये आणि प्रकल्पांना सोलार वीजपुरवठा सुरू करण्याच्या विचारात आहे. यात पाणीपुरवठ्याला लागणाऱ्या विजेसह मुख्य कार्यालय, झोन कार्यालय आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा देखील समावेश असून त्यासाठी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. किमान ३० मेगाव्हॅटचा सोलार प्रकल्प उभारणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

नव्या जलवाहिनीतून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षाला वीज बिलापोटी वर्षाला किमान शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे मोजवे लागणार आहे. या बिलाच्या ओझ्यातून सुटका करण्यासाठी महापालिकेने सोलार प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात ओबीसी कल्याण, गृहनिर्माण व पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महापालिकेला सोलार प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यंदा मेढाचे बजेट वाढले असून त्याचा लाभमहापालिकेने घ्यावा, अशी सूचना मंत्री सावे यांनी केली आहे.

दरम्यान, महापालिकेने सर्वच कार्यालयांना सोलारद्वारे जोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ठिकाणच्या सोलार प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा प्रकल्पासाठी देखील सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आवश्यकता १०० मेगाव्हॅट प्रकल्प उभारण्याची आहे. परंतु, तूर्तास ३० मेगाव्हॅटचा क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या गायरान जमिनीचा वापर करण्यात येणार असून त्यास विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी तत्त्वतः मंजुरी दिल्याचेही आयुक्त येडगे यांनी सांगितले.

येथे उभारणार सोलार प्रकल्प

कचरा प्रक्रिया प्रकल्प, महापालिकेचे सर्व झोन कार्यालये, मुख्यालय, टप्पा क्रमांक ३ इमारत, शाळा, पाणीपुरवठा विभाग, सिडको नाट्यगृह, संत एकनाथ रंगमंदिर, शहर बस सेवेतील चार्जिंग स्टेशन, शॉपिंग कॉम्प्लेक्स या सर्वांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT