रस्त्याच्या कडेला थाटलेल्या अतिक्रमणावर मनपाची कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

रस्त्याच्या कडेला थाटलेल्या अतिक्रमणावर मनपाची कारवाई

दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल : सलीम अली तलाव परिसरात वाहतुकीला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation takes action against roadside encroachments.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली गेट परिसरातील सलीम अली तलावाजवळ फुटपाथवर इतर राज्यांतील व्यापाऱ्यांनी उभारलेल्या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत दैनिक पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत शनिवारी (दि.११) मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अडथळे दूर करण्यात आल्याने वाहतुकीला दिलासा मिळाला आहे.

मनपा प्रशासनाने साप्ताहिक बाजारांमुळे शहरातील वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाफर गेट परिसरातील रविवारी बाजार, पीरबाजार तसेच चिकलठाणा येथील बाजार बंद करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासंदर्भान पीरबाजारमध्ये कारवाई करत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे.

या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांची संख्या अधिक असली तरी पीरबाजारात तालुका स्तरा-वरील व्यापारी येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र दुसरीकडे परप्रातिय काही व्यापारी रस्त्याच्या कडेला झोपड्या उभारून व्यवसाय करत असल्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होती.

तसेच सलीम अली सरोवर व हिमायत बाग परिसरात तार कुंपण असतानाही रस्त्यालगत व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीस अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर सुटीचा दिवस असूनही शनिवारी (दि.११) मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधितांना हटवले. या कारवाईनंतर परिसरातील नागरिक व पादचारी यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या पावलाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT