unauthorized plotting : साई टेकडीवरील अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेने फिरवला बुलडोझर file photo
छत्रपती संभाजीनगर

unauthorized plotting : साई टेकडीवरील अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेने फिरवला बुलडोझर

चार भूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation bulldozes unauthorized plotting on Sai Tekdi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-धुळे महामार्गालगत सातारा-देवळाई परिसरातील साई टेकडी येथे सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १९) बुलडोझर चालविला. गट क्रमांक ५४ ते ६० मधील सुमारे ४० एकर जागेवरील प्लॉटिंगची मार्किंग उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी प्लॉटविक्रेत्याचे कार्यालय आणि पाच पक्की बांधकामे पाडण्यात आली. सुमारे ४५० प्लॉटची मार्किंग हटविण्यात आली असून १२६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

चार भूमाफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संनियंत्रण १२६ जणांना बजावल्या नोटिसा अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली. सातारा-देवळाई परिसरात नवीन योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असल्याने प्लॉटच्या खरेदी-विक्रीला मागणी वाढली आहे. जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात असून मुख्य व अंतर्गत जलवाहिन्यांची कामेही सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काहींनी खासगी तसेच वन विभागाच्या जागेवर अनधिकृत प्लॉटिंग केल्याचे कारवाईत समोर आले.

प्लॉट विक्रीसाठी कार्यालय थाटून बॉण्डवर व्यवहार करण्यात आले. अनेक खरेदीदारांनी हप्त्याने पैसे भरले असून काहींनी प्लॉटवर बांधकामेही सुरू केली होती. तसेच गट क्रमांक ५४ ते ६० मधील संबंधित ले-आऊटला महापालिकेच्या नगररचना विभागाची मंजुरी घेण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

येथे ६०० व २०० चौरस मीटरचे प्लॉट आखण्यात आले होते. नागरिकांनी अनधिकृत ले-आऊटमध्ये प्लॉट खरेदी करू नये. व्यवहारापूर्वी जागेची मालकी, ले-आऊटची मंजुरी आणि अन्य कागदपत्रांची महापालिकेकडून खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ही कारवाई संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली संजय सुरडकर, कुणाल भोसले, नागरी मित्र पथक आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. अनधिकृत प्लॉटिंगबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मागील १५ दिवसांपासून कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

अनधिकृत प्लॉटिंगबाबत तक्रारी अनधिकृत प्लॉटिंगबाबत काही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मागील १५ दिवसांपासून प्रक्रिया सुरू होती. संबंधित जागेत काही खासगी क्षेत्र असून मोठा भाग वन विभागाचा आहे. कारवाईत प्लॉटविक्रेत्याचे कार्यालय आणि पाच पक्की बांधकामे पाडली. सुमारे ४५० प्लॉटची मार्किंग उद्ध्वस्त केली असून १२६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. चार भूमाफियांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण

४० एकरावर बेकायदा प्लॉटिंग

गट क्रमांक ५४ ते ६० मध्ये सुमारे ४० एकर जागेवर मंजुरीविना प्लॉटिंग करण्यात आली होती. ६०० व २०० चौरस मीटरचे प्लॉट आखून त्यांची बॉण्डवर विक्री करण्यात आली. अनेकांनी हप्त्याने पैसे भरले आहेत. संबंधित ले-आऊटला नगररचना विभागाची मंजुरी नसल्याने नागरिकांनी अशा प्लॉटमध्ये गुंतवणूक करू नये. खरेदीपूर्वी जागेची मालकी, ले-आऊटची मंजुरी आणि संबंधित कागदपत्रांची महापालिकेकडून पडताळणी करून घ्यावी.

१६२ प्लॉटची विक्री

देवळाईतील गट क्रमांक ६० मध्ये जय शंकर डेव्हलपर्सने १६२ प्लॉटचा ले-आऊट केल्याची माहिती आहे. ६०० चौरस मीटरचा प्लॉट ५ ते ७.५० लाख रुपये, तर ९०० चौरस मीटरचा प्लॉट ८ ते १० लाख रुपयांना विकण्यात आला. अनेक खरेदीदारांनी हप्त्याने पैसे भरले. 'आमचा ले-आऊट २०२० चा असून प्लॉटची गुंठेवारी होईल,' असे आश्वासन विक्रेत्यांकडून दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT