Municipal corporation begins exploring alternative water sources
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नाथसागरात सध्या मुबलक पाणीसाठा असला, तरी शहरात कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने पर्यायी जलस्रोतांची चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेच्या जुन्या नोंदीनुसार शहरात १३४ विहिरी आहेत. या विहिरींचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांची सद्यःस्थिती, पाणीसाठा आणि पाणी वापरण्यायोग्य आहे का, याची माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती सोमवारी (दि.५) महापौर समीर राजूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तर गरज पडल्यास या विहिरींचा संबंधित भागातील नागरिकांसाठी पर्यायी जलस्रोत म्हणून उपयोग केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने नाथसागरात सध्या मुबलक पाणी आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढत असल्याने पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे भविष्यातील टंचाईची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी जलस्रोतांची माहिती आतापासूनच तयार ठेवण्याची गरज असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात शहर अभियंता संजय कोंबडे यांना तीन-चार दिवसांत विहिरींचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुरेसा पाणीसाठा असलेल्या आणि वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध असलेल्या विहिरींची स्वतंत्र माहिती घेतली जाणार आहे.
आवश्यकता भासल्यास या विहिरींतून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. मात्र या जुन्या नोंदीतील विहिरींची सद्यः स्थिती तपासल्यानंतर नव्याने उपलब्ध होणाऱ्या विहिरींचीही माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात कोणते पर्यायी जलस्रोत प्रत्यक्ष उपयोगात आणता येतील, हे स्पष्ट होणार असल्याचेही राजूरकर यांनी यावेळी
प्रभाग ४ मध्ये सर्वाधिक विहिरी
महापालिकेच्या जुन्या सर्वेक्षणानुसार प्रभाग ४ मध्ये सर्वाधिक २९ विहिरी आहेत. त्यानंतर प्रभाग ९ मध्ये २६, प्रभाग ८ मध्ये २५, प्रभाग ७ मध्ये १५ आणि प्रभाग १ मध्ये १४ विहिरी आहेत. प्रभाग ५ मध्ये १२, प्रभाग ६ मध्ये ८, प्रभाग ३ मध्ये ३ आणि प्रभाग २ मध्ये २ विहिरींची नोंद