Sambhajinagar News : मनपाकडून शहरातील नालेसफाईला सुरुवात file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपाकडून शहरातील नालेसफाईला सुरुवात

स्थायी समिती सभापतींच्या पाहणीनंतर झोन ५, ६ व ७ मध्ये मोहीम गतिमान

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation begins cleaning of city drains.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील नालेसफाई व कचरा व्यवस्थापनाच्या रखडलेल्या कामांना अखेर गती मिळाली असून, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या पाहणीनंतर दुसऱ्याच दिवशी विविध झोनमध्ये तात्काळ कामांना सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी झोन क्र. ५, ६ व ७ मध्ये मंगळवारी (दि.७) प्रत्यक्ष पाहणी करून नालेसफाई तसेच कचरा व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक सुनिल जगताप, कमल नरोटे व प्रियांका खोतकर यांची उपस्थिती होती. पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचऱ्याचे ढीग आणि अपुऱ्या साफसफाईमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

तसेच झोन क्र. ७ मध्येही पाहणी करण्यात आली. यावेळी गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, यांच्यासह नगरसेवक अनिता मानकापे, नंदलाल गवळी व अर्चना शेलार यांची उपस्थिती होती. पाहणीनंतर संबंधित विभागांना तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश सभापती मकरीये यांनी दिले होते.

यावरून दुसऱ्याच दिवशी बुधवारी (दि.८) झोन ५, ६ आणि ७ मध्ये नालेसफाई मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्था करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेच्या स्थितीत लवकरच सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT