Sambhajinagar News : मुख्य विसर्जन मार्गाची मनपा-पोलिस प्रशासनाकडून पाहणी  file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मुख्य विसर्जन मार्गाची मनपा-पोलिस प्रशासनाकडून पाहणी

मार्गावरील केबल, वीजवाहिन्या, मलबा हटवण्यासह अतिक्रमणांवर कारवाईच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation and police administration inspect the main immersion route

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने बुधवारी (दि.२३) मुख्य मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी केली. संस्थान गणपती मंदिरापासून राजाबाजार, शहागंज, सिटी चौक, गुलमंडीमार्गे संभाजीपेठेतील जिल्हा परिषद मैदानापर्यंत पायी पाहणी करताना आढळलेले अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना संबंधित संबंधित यंत्रणां यंत्रणांना देण्यात आल्या. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह मनपा, पोलिस प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी पाहणीमध्ये सहभागी झाले होते.

महापालिका आणि पोलिस प्रशासनाने बुधवारी शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या व अनधिकृत केबल तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महावितरणच्या वीजवाहिन्यांची आवश्यकतेनुसार उंची वाढविण्याचे निर्देशही देण्यात आले.

यासह पाइपलाइनच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामाजवळ पडून असलेला मलबा, पाइप आणि अन्य बांधकाम साहित्य हटविण्याचे आदेश देण्यात आले. तर उघड्या पाण्याच्या व्हॉल्व्हवर झाकणे बसविण्यासह मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. दरम्यान, संभाजीपेठेतील जिल्हा परिषद मैदान, गारखेडा येथील क्रीडा संकुल आणि शिवाजीनगर येथील विसर्जन विहिरींचीही पाहणी करण्यात आली.

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन स्वच्छता, पुरेसा प्रकाश, वाहतूक नियमन आणि आवश्यक सोयी-सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले. संस्थान गणपती ते संभाजीपेठ संस्थान गणपती मंदिर, राजाबाजार, शहागंज, सिटी चौक, गुलमंडीमार्गे संभाजीपेठेतील जिल्हा परिषद मैदान हा मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आहे. या मार्गावरील अडथळे वेळेत दूर करून मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तीन ठिकाणी विसर्जनाची सुविधा

संभाजीपेठेतील जिल्हा परिषद मैदान, गारखेडा येथील क्रीडा संकुल आणि शिवाजीनगर येथे गणेश विसर्जनासाठी विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे.

क्रीडा संकुलात यंदा प्रथमच विहीर

गारखेडा परिसरातील क्रीडा संकुलात यंदा प्रथमच गणेश विसर्जनासाठी विहीर तयार करण्यात आली आहे. मोठी मोकळी जागा तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने परिसरातील नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT