Marathwada Mukti Sangram Din : शाळांमध्ये मुक्तिसंग्राम दिन साजरा file photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Mukti Sangram Din : शाळांमध्ये मुक्तिसंग्राम दिन साजरा

मुकुल मंदिर शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

पुढारी वृत्तसेवा

'Mukti Sangram Din' Celebrated in Schools

छत्रपती संभाजीनगर : मुकुल मंदिर शाळेत 'मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन' देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुकुल हार संस्थेचे अध्यक्ष कमांडर अनिल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सहसचिव दिलीप यार्दी, मुख्याध्यापक जयंत चौधरी व सुरेश परदेशी प्रामुख्याने उपस्थित होते. कमांडर सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. ज्योत्स्ना जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर दिलीप यार्दी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगतातून हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात कमांडर सावे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचे महत्त्व पटवून दिले. आशा राठोड यांनी सूत्रसंचालन केले आणि श्रीमती मंजुषा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास तिन्ही विभागांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानप्रकाश विद्या मंदिर

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील ज्ञानप्रकाश विद्या मंदिरात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक एस. पी. जवळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोनल चौरसिया, श्रद्धा शेळके व सोहम धुळे या विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे केली. मार्गदर्शन करताना संस्थापकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या आदर्शावर चालण्याचे, तसेच शाळेच्या एनसीसी पथकासह डिजिटल क्लासरूमचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सपना धुळे यांनी सूत्रसंचालन केले व काजल चौरसिया यांनी आभार मानले.

ओम इंटरनॅशनल स्कूल

छत्रपती संभाजीनगर : ओम इंटरनॅशनल टेक्नो स्कूल व ओम किड्स इंग्लिश स्कूल येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पाच्या विधिवत पूजा व आरतीने झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. बी. व्ही. जाधव होते. याप्रसंगी नगरसेवक उल्हास पाटील साळवे, किशोरभाऊ नागरे, प्रशालेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव, शाळा समिती अध्यक्ष मंगला जाधव व मुख्याध्यापिका प्रियांका मगर-पाटील उपस्थित होत्या. नगरसेवक नागरे व साळवे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत महानगरपालिका स्वच्छतेमध्ये १६ व्या क्रमांकावर आल्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे राजपूत यांनी मराठवाड्याच्या विकासावर प्रकाश टाकला. भगवान वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू गिरी यांनी मनोगत व्यक्त केले तर कृष्णा दानवे यांनी आभार मानले. शेवटी उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT