एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ST card issue : एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण

199 रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागतात 300 रुपये

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसटीतून विविध वर्गातील प्रवाशांना पूर्ण मोफत तसेच 50 टक्क्यांची सवलत देण्यात येते. एसटी महामंडळाने (एनसीएमसी) कार्ड अनिवार्य केले आहे. या कार्डासाठी जिल्हाभर एजन्सी व उप एजन्सी काम करत आहेत.

या कार्डसाठी एसटीने 199 रुपये आकारण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश धाब्यावर बसवत अनेक एजन्सीधारक या स्मार्ट कार्डसाठी 300 ते 350 रुपये आकारत आहेत. हे कार्ड एन्सीधारकांसाठी लुबाडणुकीचे कुरण बनले आहे.

एसटीच्या वतीने विविध वर्गवारीतील प्रवाशांना प्रवासात विशेष सूट देण्यात आली आहे.यात ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, माजी सैनिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्याधिग््रास्त व इतर सवलतीधारक प्रवाशांना हे स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड काढण्यासाठी 199 रुपये आकारण्यात येत आहेत.

दरम्यान, या कार्डची एजन्सी शहरांसह ग््राामीण भागात मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. हे एजन्सीधारक अमृत ज्येष्ठ, महिलांकडून एका कार्डसाठी 300 ते 350 रुपये आकारत आहेत. जास्त पैसे नाही दिले तर कार्ड देण्यास नकार देत आहेत.

मोबदला तरीही लूट

एजन्सीधारकांना प्रत्येक कार्डसाठी 10 रुपये व कार्डवर रिचार्ज करण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 3 रुपये कमिशन देण्यात येते. असे असले तरी एजन्सी धारक हे कार्ड काढण्यासाठी चक्क जास्तीचे 100 ते 150 रुपये कार्डधारकांकडून उकळत आहेत.

तारखेची भीती

हा महिना शेवटचा आहे कार्ड काढले नाही तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, अशी भीती अनेक एजन्सीधारक दाखवत आहेत. त्यामुळे सवलतधारक या भीतीपोटी लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी घाई करत आहेत. दरम्यान, हे कार्ड कधीपासून अनिवार्य करणार आहे, याची माहिती एसटीकडून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आली नसली तरी एजन्सीधारक मात्र ही भीती सवलतधारकांमध्ये पसरवत आहेत.

तक्रार आल्यानंतर कारवाई एजन्सीधारक ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारत असतील तर कार्डधारकांनी तशी तक्रार करावी. तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT