ST Pudhari
छत्रपती संभाजीनगर

MSRTC cleanliness tax : एसटी तिकिटात २ रुपये वाढ; १५ एप्रिलपासून स्वच्छता कर लागू

स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब : तरीही प्रवाशांवर आर्थिक भार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाने प्रवाशांना बससह बसस्थानक, तेथील स्वच्छतागृह, प्रतीक्षालयांत स्वच्छता उपलब्ध करून देण्यास १५ एप्रिलपासून प्रवाशांकडून स्वच्छता कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे २ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. बसस्थानक, स्वच्छतागृहे तसेच बसच्या स्वच्छतेबाबत बोंबाबोंब असताना स्वच्छता कर मात्र वसूल करण्यात येत असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर आहे.

राज्यात एसटीची १५१ आगार व ५९८ बसस्थानके आहेत. याची स्वच्छता कंत्राटी कामगारांकडून करवून घेण्यात येत आहे.दरम्यान, स्वच्छतेबाबत तक्रारी वाढल्याने आता स्वच्छतेचे काम कराच्या माध्यमांतून मिळालेल्या पैशांतून दर्जेदार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने १४ एप्रिलच्या मध्यरात्री पासून मासिक, त्रैमासिक पास धारक व सर्वसामांन्य प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटांसाठी २ रुपये एसटीने प्रवास करतात. स्वच्छता कर वसूल करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र दर्शनसाठी ५ रुपये तर विशेष कामांसाठी बस घेणाऱ्यांना एका बससाठी प्रत्येक दिवस ५० रुपये आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.

स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब

बस प्लॅटफॉर्मवर लागण्यापूर्वी आतून बाहेरून स्वच्छत असावी, एसटी बसमधील चार्जिंग पॉइंट व इतर सुविधा या नियमित तपासल्या जाव्यात असा दंडक आहे. असे असतानाही शिवशाही असो की इतर बस असो त्यात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात असते. आरामदाई शिवशाहीत तर मुंग्या आणि झुरळाचा प्रवास असतोच यात सुधारणा करण्याच्या नावाखाली स्वच्छता कराचा बोजा प्रवाशांवर टाकण्यात येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यांना मिळणार सवलत

स्वच्छता करातून विद्यार्थी, अहिल्याबाई होळकर पास, १४ एप्रिलच्या आगोदर तिकीट बुक करणाऱ्यांना, तसेच मानव विकासचे विद्यार्थी यांना स्वच्छता कर वसूल करण्यातून सवलत मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT