MLA Abdul Sattar : १३१ गावांच्या वॉटर ग्रीडची वीजकामे महिनाभरात पूर्ण करा file photo
छत्रपती संभाजीनगर

MLA Abdul Sattar : १३१ गावांच्या वॉटर ग्रीडची वीजकामे महिनाभरात पूर्ण करा

आमदार अब्दुल सत्तार यांचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश

पुढारी वृत्तसेवा

MLA Abdul Sattar: Complete the electrical works for the 131-village water grid within a month

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील १३१ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वॉटर ग्रीड योजनेला गती देण्यासाठी वीज वितरण विभागाची प्रलंबित कामे महिनाभरात पूर्ण करून योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर येथील वीज वितरण विभागाच्या परिमंडळ कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य अभियंता दीपक कुंठेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याबरोबरच १३१ गावांना पाणीपुरवठा करणारी वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित होण्यामध्ये वीज वितरण विभागाची काही कामे अडथळा ठरत आहेत. त्यामुळे संबंधित सर्व कामांना प्राधान्य देऊन युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. यावर मुख्य अभियंता दीपक कुंठेकर यांनी वीजविषयक प्रलंबित कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा सर्कलमधील जामठी येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करावा. सोयगाव व सावळदबारा परिसरातील वीज वितरण विभागाच्या रिक्त पदांवर कर्मचारी नियुक्त करावेत, असेही सत्तार यांनी सांगितले. बैठकीत जीर्ण विद्युत खांब व तारांचे नूतनीकरण, नवीन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देणे, रोहित्रांची क्षमता वाढविणे, तलाव परिसरातील अवैध पाणी उपसा रोखणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुंठेकर, अधीक्षक अभियंता विनय घनबहादूर, अधीक्षक अभियंता बिना सावंत, नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, जिप सदस्य अब्दुल आमेर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक माजी अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, गणेश पा. ढोरमारे, सय्यद नासेर हुसेन, अशोक सूर्यवंशी, विनोद मंडलेचा, लक्ष्मण जगताप, कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, आर. पी. नहाटा, उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे, शहर अभियंता धम्मपाल म्हस्के, सिल्लोड नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दिकी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT