Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : ऑनलाइन गेममधून झालेली ओळख अल्पवयीन मुलीला महागात पडली; धमकी देऊन अश्लील छायाचित्रे मागवले

त्रासामुळे वैतागलेल्या मुलीने शेवटी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइनगेममधून झालेली ओळख सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीस चांगलीच महागात पडली. ओळख झालेल्या तरुणाने आई वडिलांना सांगण्याची धमकी देत तिचे अश्लील छायाचित्र मागवले. आणि त्याचेही अश्लील छायाचित्र तिला पाठवले. या त्रासामुळे वैतागलेल्या मुलीने शेवटी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणात १४ वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पीडिता ७ व्या वर्गात शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये रोब्लॉक्स या ऑनलाईन गेममधून आर्यन आत्रे या तरुणाशी ओळख झाली. ओळखींनंतर दोघात रोब्लॉक्सवर चॅटिंग सुरू झाली. त्यानंतर आर्यनने पीडितेला स्नॅपचॅटवर दोन खाती तयार करून त्याचे पासवर्डही तिला दिले. यानंतर या दोघांत स्नॅपचॅटवर चॅटिंग केली. यानंतर त्या मुलाने तिला व्हाट्सअॅप सुरू करण्यास सांगितले. मुलीने याला नकार दिल्यानंतर मात्र त्याने आई वडिलांच्या फोन पे वरील सर्व पैसे काढून घेण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

मुलीने व्हाट्सअॅप सुरू केले. यावर सुमारे पंधरा दिवस यावर चॅटिंग सुरू होती असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. अश्लील छायाचित्रांची मागणी मार्च २०२६ मध्ये आर्यनने पीडितेला तिचे अश्लील छायाचित्र पाठवण्यास सांगितले. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने पुन्हा फोन पे वरील पैसे काढून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून पीडितेने स्वतःचे अश्लील छायाचित्र काढून पाठविले. त्यानंतर आर्यननेही स्वतःचेही अश्लील छायाचित्रे तिला पाठविले. जुलै २०२६ पर्यंत आर्यन व्हॉट्सअॅप, व्हीडिओ, तर कधी व्हाईस रेकॉडींगद्वारे चॅटींग करत होता.

चार इन्स्टाग्राम खात्यांचा वापर

जुलै महिन्यात आर्यनने पीडितेला विविध चार इन्स्टाग्राम अॅप खात्यावरून पीडितेशी चॅटिंग केले. दरम्यान, आर्यनच्या इन्स्टाग्राम खात्यावरून आयांश ठाकरे आणि मुझमिल खान या नावानेही पीडितेशी चॅटिंग करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तुझ्या मम्मी-पप्पांना कॉल करून सांगेन, अशा धमक्या दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद आहे.

पीडितेच्या आईलाही धमकी

५ ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेच्या आईला कॉल करून, तुमची मुलगी माझ्या भावासोबत चॅटिंगग करते. त्यामुळे माझा भाऊ आत्महत्या करत होता. त्यानंतर पीडिता आणि आर्यन यांच्यातील चॅटींगचे स्क्रीनशॉट तिच्या आईला पाठवून ब्लॅकमेल केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT