Flour mill business : दळणाचे दर आता ७ रुपये प्रतिकिलो file photo
छत्रपती संभाजीनगर

Flour mill business : दळणाचे दर आता ७ रुपये प्रतिकिलो

१ जुलैपासून नव्या दराची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

Milling rate now Rs. 7 per kg

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या महागाईचा फटका आता पिठाच्या गिरणी व्यवसायालाही बसला असून, १ जुलैपासून दळणाचे दर प्रतिकिलो ७ रुपये करण्याचा निर्णय मराठवाडा पिठ गिरणी मालक संघाने घेतला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून स्थिर असलेल्या दळणाच्या दरात वाढ करून प्रतिकिलो ७ रूपये करण्याचा निर्णय मराठवाडा पिठ गिरणी मालक संघाने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेतला आहे. गिरणी व्यवसायासाठी लागणाऱ्या दगडांसह बेअरिंग, ग्रीस, पट्टा, नट-बोल्ट, पुली, इलेक्ट्रिक स्टार्टर दुरुस्ती आणि इतर साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सध्याच्या दरात व्यवसाय चालविणे कठीण झाल्याचे संघाचे अध्यक्ष रमेश राधाकिशन घोडेले यांनी सांगितले.

या संदर्भात झालेल्या संघाच्या बैठकीत दळणाचे दर वाढविण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार १ जुलै पासून प्रतिकिलो हे दर आकारण्याचे आवाहन सर्व गिरणी मालकांना करण्यात आले आहे.

या बैठकीला शे. तुराब शे. समशोद्दीन, राजकुमार गुप्ता, शे. जिलानी शे. इमाम, भरत पवार, विश्वनाथ खांडे, शौकत पटेल, सुभाष पाटील घोडके आदींची उपस्थिती होती. या नव्या दरवाढीला अनेक गिरणी मालकांनीही सहमती दर्शवत त्याची अंमलबजावणी करण्याचे निवेदन संघाकडे दिले असल्याचे संघटनेच्यावतीने कळवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT