गुन्हे शाखेच्या पथकाकडून मॅफेड्रोन जप्त Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : गुन्हे शाखेच्या पथकाकडून मॅफेड्रोन जप्त

ड्रग्ज, मोबाईलसह ३ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त

पुढारी वृत्तसेवा

Mephedrone seized by the crime branch team

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आमखास मैदान परिसरात नशेसाठी वापरण्यात येणारे मॅफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्री करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.७) त्याच्या मुसक्या आवळल्या. ग्रग्ज विक्री करणाऱ्याचे नाव शेख आफताब शेख सलीम (१९ रा. भाईवाडा) असे असून त्याच्याकडून ड्रग्ज, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आमखास मैदान परिसरातील भिंतीजवळ एम नावाचे ड्रग्ज विक्री करण्यासाठी तरुण आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहिती मिळताच त्या परिसरात सापळा रचून शेख आफताब शेख सलीम ताब्यात घतल त्याच्याजवळ नशेकरिता वापरले जाणारे एमडी (मॅफेड्रोन) सदृष्य मिळून आली.

त्याच्या ताब्यातून २० ग्रॅम वजनाचे एमडी एक मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरचा माल त्याला शेख इराफ शेख अरशद (रा. अबरार कॉलनी), इरफान रा. भिवंडी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांनी पुरविले असल्याचे त्याने सांगितल्याने गुन्हे शाखेतील पोउपनि वाघ यांच्या पथकाने शेख इराफ शेख अरशद (रा. अबरार कॉलनी) यास ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदद्यान्वये वेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहा. पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, पोउपनि प्रवीण वाघ, शिंदे, नवसारे, निकम, सोनटक्के, यदद्माळ, छाया लांडगे, प्रीती इलग, यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT