MPSC paper leak : एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ महामोर्चा; वाहतूक मार्गात बदल file photo
छत्रपती संभाजीनगर

MPSC paper leak : एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ महामोर्चा; वाहतूक मार्गात बदल

एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून, संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) शहरात विशाल मोर्चाचे आयोजन केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mass protest against MPSC paper leak; traffic route changes

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असून, संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) शहरात विशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता असल्याने, वाहतूक पोलिसांनी विभागीय आयुक्तालय परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.

वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक रेखा लोढे यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून मोर्चा संपेपर्यंत अण्णा भाऊ साठे चौक ते उद्धवराव पाटील चौक हा मुख्य रस्ता सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

त्यानुसार एका पर्यायी मार्गान वाहने चांदणे चौक, गणेश कॉलनी, एन-१२ विसर्जन विहीर, सत्य विष्णू हॉस्पिटल मार्गे पुढे जाऊ शकतील. तर दुसऱ्या पर्यायी मार्गाने जाणाऱ्या वाहनांना उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नर, टी. व्ही. सेंटर आणि एन-१२ गणपती विसर्जन विहीर मार्गे ये-जा करावी लागेल. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT