Farm Insurance  File Photo
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीने नुकसान झाले तरी, जमिनीत ओलावा! रब्बीचे क्षेत्र वाढणार, उन्हाळी मक्यात 50 हजार हेक्टरची वाढ

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinaga Farming News | छत्रपती संभाजीनगर

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची मदार पूर्णपणे रब्बी हंगामावर अवलंबून आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत यंदा एकूण 10 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

वाढलेल्या रब्बी क्षेत्राचे कारण:

  • अधिक क्षेत्र: कृषी विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा रब्बीचे हे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६० हजार हेक्टरने अधिक असेल.

  • मागील नुकसानीचा फटका: मराठवाड्यात खरीप हंगामात सुमारे ५० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी ८० टक्के क्षेत्रावरील पिकांना पावसाचा जबरदस्त फटका बसला. एवढेच नाही, तर जी काही थोडीफार पिके उरली होती, त्यांचे दिवाळीत सुरू झालेल्या पावसाने पुन्हा नुकसान झाले. या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामातील पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

  • पावसाची स्थिती: यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात झाल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून आहे. तसेच, पुढील काही दिवस पाऊस पडणार असल्याने रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पिकांचे क्षेत्र:

यावर्षी अधिक पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील गहू, मका आणि हरभरा या प्रमुख पिकांचे क्षेत्र वाढणार आहे.

पीक अपेक्षित क्षेत्र वाढहरभरा सुमारे २५ हजार हेक्टरपर्यंत वाढ उन्हाळी मकासुमारे 50 हजार हेक्टरने वाढ गहू सात ते आठ हजार हेक्टरने वाढ

हरभरा हे कमी पावसात येणारे पीक असल्याने यंदा त्याच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे. या आकडेवारीनुसार, अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या बळीराजाला रब्बीचा हंगाम काही प्रमाणात दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT