Marathwada Temperature  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Temperature : मराठवाडा तापला, पारा ३७.४ अंशांवर

पुढील आठवड्यात ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, शुक्रवारी (दि. ९) छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. परभणीत ३७, तर बीडमध्ये ३६.५ अंश तापमानाची नोंद झाली. विभागातील बहुतांश जिल्ह्यांत पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. पुढील आठवड्यात नांदेडमध्ये कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज असून, ऑक्टोबर हीटचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० ते १६ ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ३५ ते ३८ अंश, तर किमान तापमान २० ते २४ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश, तर बीड, लातूर, धाराशिव आणि परभणीत ३६ ते ३७ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. हिंगोलीतही पारा ३५ ते ३७ अंशांपर्यंत जाऊ शकतो. आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असल्याने दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. रात्रीचे तापमान तुलनेने कमी असले, तरी दिवसा उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT