चौदा लाख शेतकऱ्यांची 1967 कोटींची मदत थांबली pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : चौदा लाख शेतकऱ्यांची 1967 कोटींची मदत थांबली

अतिवृष्टीग््रास्त शेतकरी वाऱ्यावर, महसुली यंत्रणेची दप्तरदिरंगाई, रब्बी हंगाम संपला तरी खरिपाची मदत मिळेना

पुढारी वृत्तसेवा

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात लाखो हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील नुकसानग््रास्त शेतकर्‌‍यांसाठी तब्बल 8 हजार 701 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला. मात्र आता सहा महिने उलटले तरी केवळ 77 टक्केच मदतीचे वाटप होऊ शकले आहे.

मराठवाड्यातील तब्बल 14 लाख 22 हजार लाभार्थींची सुमारे दोन हजार कोटी रुपयांची मदत अजूनही थांबली आहे. महसुली यंत्रणेच्या दप्तरदिरंगाईमुळे हा निधी वितरित होणे थांबल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यात जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत जवळपास सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पूर आणि अतिवृष्टीमुळे सर्व शेती पिके नष्ट होऊन शेतकर्‌‍यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यातील इतर काही भागांतही अशाच पद्धतीने शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरातील अतिवृष्टीग््रास्त शेतकर्‌‍यांसाठी तब्बल

बँक खात्यावर अनुदान जमा झालेले लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर- 10 लाख 31 हजार 294

जालना - 9 लाख 24 हजार 463

परभणी - 10 लाख 62 हजार 419

हिंगोली- 6 लाख 58 हजार 630

नांदेड - 14 लाख 15 हजार 948

बीड - 16 लाख 79 हजार 464

लातूर -13 लाख 78 हजार 838

धाराशिव - 10 लाख 71 हजार 374

एकूण - 92 लाख 22 हजार 430

जिल्हानिहाय एकूण लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर - 13 लाख 79 हजार 552

जालना- 12 लाख 51 हजार 39

परभणी -11 लाख 56 हजार 576

हिंगोली- 7 लाख 29 हजार 872

नांदेड- 17 लाख 34 हजार 154

बीड - 17 लाख 40 हजार 539

लातूर -14 लाख 1 हजार 793

धाराशिव - 12 लाख 51 हजार 478

एकूण - 1 कोटी 6 लाख 45 हजार 3

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT