Marathwada awaits substantial rainfall
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढू लागला असून, ५ जुलैपर्यंत विभागात जून-जुलै मिळून सरासरीच्या ८७.७टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २१.२ टक्के पाऊस झाला असून, अजूनही सरासरी गाठण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. विभागात ५ जुलै रोजी ७.७ मिमी पावसाची नोंद झाली.
जून-जुलै कालावधीत सर्वाधिक १००.५ टक्के पाऊस जालना जिल्ह्यात झाला असून, त्यापाठोपाठ छत्रपती संमाजीनगर (२५.२ टक्के), थाराशिव (२३.६ टक्के), बीड (८९.२ टक्के), नांदेड (८६.१ टक्के) आणि हिंगोली (८३.८ टक्के) जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
तर लातूर (७०.२ टक्के) आणि परभणी (७०.४ टक्के) जिल्ह्यांत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीच्या केवळ ८४.३ टक्के पाऊस झाला होता. जुलैच्या सुरुवातीला अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी खरीप हंगामासाठी सातत्यपूर्ण आणि दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.