छत्रपती संभाजीनगर

शैक्षणिक प्रवेशापूर्वी आरक्षण गरजेचे : मनोज जरांगे

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : जूनमध्ये सुरू होणार्‍या शैक्षणिक प्रवेशापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे असल्याने येत्या 4 जूनला उपोषणाला बसणार असल्याचे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. जरांगे यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी रविवारी (दि. 19) ते माध्यमांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले, समाज बांधवांची इच्छा होती, मी उपोषण करू नये. मात्र, त्यांच्याच लेकरांच्या भविष्यासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे 4 जूनला उपोषणाला राज्यातील घराघरातील मराठा समाज अंतरवाली सराटीत असेल. मी राजकारणात येण्यात इच्छुक नाही. मात्र सरकारने सगेसोयर्‍याची अंमलबजावणी व मराठा कुणबी एक असल्याचा कायदा केला नाही तर समाजाला सत्तेत घालून निवडणूक लढवावी लागेल, असे जरांगे म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देखील मराठा समाजाने ताकदीने मतदान करा. मराठा समाजाने लेकरं डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत मतदान करा. नाशिकच्या उमेदवाराला माझा पाठिंबा नाही. माझा कोणालाच पाठिंबा नाही, असेही जरांगे म्हणाले.

SCROLL FOR NEXT