अन्यथा तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकणार नाही; गृहमंत्री शहा यांना जरांगेंचा इशारा  Amit Shah Manoj Jarange Patil
छत्रपती संभाजीनगर

अन्यथा तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकणार नाही; गृहमंत्री शहांना जरांगेंचा इशारा

अन्यथा तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकणार नाही; गृहमंत्री शहा यांना जरांगेंचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: मराठ्यांचे आंदोलन गोडीगुलाबीने हाताळले तर तुम्हाला सत्तेपासून कोणी रोखू शकत नाही. मात्र मराठ्यांना आरक्षणापासून दूर ठेवले तर तुमचे गणिते नाही, तुम्हाला जे यंत्र आणायाचे ते आणा, तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला आहे. जरांगे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांनी रविवारी (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे बोलताना म्हणाले, पटेल, गुर्जर यांच्याप्रमाणे मराठ्यांचे आंदोलन हाताळणार असाल आणि तेपण आरक्षण न देता तर ती, तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक असेल. तुमच्या आंदोलन हाताळण्याच्या व काम करण्याच्या पद्धती मला माहिती आहेत.

जॉर्ज फर्नांडिस, व्यंकय्या नायडू, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया, सुषमा स्वराज यांनी तुमच्या पक्षासाठी देह झिजवला त्यांना तुम्ही बाजूला केलेत. मोहन भागवत खंबीर आहेत त्यामुळे टिकून आहेत. तसेच नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत येतात, तेंव्हा त्यांना मागे फेकतात, असा आरोप त्यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT