Manoj Jarange Patil Press Conference Audio Clip
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil : फडणवीसांना मराठा समाजापासून तोडायचा डाव होता का? ऑडिओ क्‍लीपवर मनोज जरांगे पाटील यांचा सवाल

संजय राऊत आणि प्रसाद लाड यांच्‍या ऑडिओ क्‍लिपशी काही संबंध नाही

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Press Conference Audio Clip : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीच्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत, "या ऑडिओ क्‍लीपमध्‍ये चर्चा करणार्‍यांना एकाच दगडात दोन ते तीन पक्षी मारायचे होते का? देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजापासून तोडायचा डाव होता का? कोण फडणवीस यांना वाचवण्याचा प्रयत्‍न करत होते?" असे सवाल उपस्‍थित केले.

दोघांच्‍या भांडणात तिसर्‍याचा लाभ, याचा अर्थ काय?

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये जरांगे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपमधील मराठा नेत्यांना पुढे करणे, त्यांच्याविरोधात वातावरण तयार करणे आणि त्यासाठी वैयक्तिक निधीतून खर्च करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. आता याच क्‍लिपबाबत आज पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्‍हणाले की, "ऑडिओ क्‍लीपमधील दोघांच्‍या भांडणात तिसर्‍याचा लाभ, याचा अर्थ काय? देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजापासून तोडायचा डाव होता का? की फडणवीस संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्‍न करत आहेत?" असे सवाल जरांगे यांनी उपस्‍थित केले.

संजय राऊत आणि प्रसाद लाड यांच्‍या क्‍लिपशी संबंध नाही

या ऑडिओ क्‍लीपचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याशी संबंध नाही, असा दावाही त्‍यांनी केला.

गैरसमज पसवणार्‍यांकडे दुर्लक्ष करा

हे प्रकरण भयंकर आहे. यातील सत्‍य जेव्‍हा तुम्‍हाला समजेल तेव्‍हा वेळ निघून गेलेली असेल. गैरसमज पसरवणाऱ्यांवर मराठा समाजाने डोळे झाकून विश्‍वास ठेवू नका, असे आवाहनही त्‍यांनी केले.

एकनाथ शिंदे यांच्‍या मुलाचे नाव का घेतले, याचा शोध लागलाच पाहिजे

ऑडिओ क्‍लीपमध्‍ये आरक्षणापेक्षा व्‍यक्‍ती महत्त्‍वाची आहे, असे दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले, तर नक्‍कीच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागेल; मात्र ऑडिओ क्‍लीपच्‍या माध्‍यमातून नेमकं कोणाला टार्गेट केले जात आहे? एकनाथ शिंदे व त्‍यांच्या मुलाने आपण पैसे घेतले नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. मग ऑडिओ क्‍लीपमध्‍ये एकनाथ शिंदे यांच्‍या मुलाचे नाव का घेतले, याचा शोध लागलाच पाहिजे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशी करून सत्‍य समोर आणावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT