Dahi Handi : उद्या 'दहीहंडी' निमित्त शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल file photo
छत्रपती संभाजीनगर

Dahi Handi : उद्या 'दहीहंडी' निमित्त शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल

शहरात शनिवारी (दि.५ सप्टेंबर) 'दहीहंडी' उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Major changes to in the city tomorrow due to 'Dahi Handi'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात शनिवारी (दि.५ सप्टेंबर) 'दहीहंडी' उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरात क्रांती चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, बजरंग चौक, टी. व्ही. सेंटर आणि गजानन महाराज मंदिर चौक अशा विविध ठिकाणी लहान-मोठ्या दहीहंड्यांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी गोविंदा पथके आणि नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने, सुरक्षिततेच्या हे मार्ग राहतील बंद

१) क्रांती चौक : क्रांती चौक ते सिल्लेखाना चौक हा मार्ग बंद राहील.

२) गुलमंडी परिसर : पैठणगेट ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी, बाराभाई ताजिया चौक ते गुलमंडी, सिटी चौक ते गुलमंडी आणि औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया हे मार्ग बंद राहतील.

३) कॅनॉट प्लेस व परिसर : एचडीएफसी बँक एटीएम चौक ते कॅनॉट प्लेस, बॉम्बे स्टेशनरी ते कॅनॉट प्लेस, वाय झेड फोर्ड शोरूम ते कॅनॉट प्लेस, बाळासाहेब सानप कार्यालय ते कॅनॉट प्लेस आणि सिडको कार्यालयाशेजारील रस्ता ते कॅनॉट प्लेस हा भाग वाहतुकीसाठी बंद राहील.

४) अविष्कार व बजरंग चौक : चिश्तिया चौक ते हिंदुराष्ट्र चौक मार्ग बंद असेल.

५) टी. व्ही. सेंटर परिसर : साक्षी मंगल कार्यालय, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक आणि आय.पी. मेस या ठिकाणांहून टी. व्ही. सेंटरकडे जाणारे सर्व मार्ग बंद राहतील.

६) गजानन महाराज मंदिर चौक : पतियाळा बँक, जवाहरनगर पोलीस ठाण्यापुढील आदिनाथ चौक, त्रिमूर्ती चौक आणि सेव्हन हिल उड्डाणपूल येथून गजानन महाराज मंदिर चौकाकडे जाणारे मार्ग बंद राहतील.

दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी वाहतूक नियोजन केले आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील काही प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असून, त्यासाठी पर्यायी मार्गांची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

असे आहेत पर्यायी मार्ग

१) क्रांती चौक ते सिल्लेखाना : वाहने क्रांती चौक, सेशन कोर्ट सिग्नल, सावरकर चौक मार्गे सिल्लेखाना चौकाकडे जातील.

२) गुलमंडी परिसर : पैठणगेटून येणारी वाहने बाबुराव काळे चौक-निराला बाजार मार्गे जातील. अंगुरीबागकडून येणारी वाहने गोमटेश मार्केट मार्गे, सिटी चौकाकडून येणारी वाहने जुना बाजार मार्गे, तर औरंगपुरा पोलिस चौकीकडून येणारी वाहने नाथ सुपर मार्केट व कुंभारवाडा मार्गे वळवण्यात येतील.

३) टी.व्ही. सेंटर परिसर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गणेश कॉलनी मार्गे येणारी वाहने स्वर्ग हॉटेल (एन-१२) मार्गे जातील. हडको कॉर्नरची वाहने दिल्ली गेटकडे वळवली जातील. सेव्हन हिलकडून येणारी वाहतूक आय.पी. मेस चौकातून वळवली जाईल, तर जळगाव रोडकडून येणारी वाहने जिजाऊ चौकातून एम-२ रोडकडे वळवली जातील.

४) गजानन महाराज मंदिर चौक : पतियाळा बँकेकडून येणारी वाहने रिलायन्स मॉल मार्गे जातील. जवाहरनगर ठाणे व त्रिमूर्ती चौकाकडून येणारी वाहने हेडगेवार रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने वळवली जातील. सेव्हन हिल उड्डाणपुलावरून येणारी वाहने थेट आकाशवाणीकडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT