पैठण : भगवान महावीर जन्म जन्मकल्याणक महोत्सव सोहळ्यानिमित्त पैठण शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या स्वागतासाठी शहराच्या मुख्य मार्गावर रांगोळी व पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
शहरातील महावीर चौकातून भगवान महावीर यांची प्रतिमा असलेल्या रथाची व पालखी पूजन राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे व पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी भगवान महावीर यांचा जय जयकार करण्यात आला. महिला भाविकांनी डोक्यावर कळस घेऊन शोभायात्रेत सहभाग घेतला होता. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष अभिजीत कासलीवाल, उपाध्यक्ष धीरज पाटणी, सचिव निखिल शिंगवी, विजय पापडीवाल, विलास पहाडे, प्रमोद कासलीवाल, सुमित गंगवाल, किशोर भाकरे, स्वदेश पांडे, माजी नगरसेवक कल्याण भुकेले, महावीर बडजाते, डॉ. प्रकाश कासलीवाल, राका, पवन बडजाते कैलास पाटणे यांच्यासह जैन बांधव, राजस्थान महिला मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.