Loan waiver : कर्जमाफी रखडली, बँकांकडून वसुलीचा तगादा file photo
छत्रपती संभाजीनगर

Loan waiver : कर्जमाफी रखडली, बँकांकडून वसुलीचा तगादा

शेतकऱ्यांना रक्कम मिळेपर्यंत वसुलीची कारवाई थांबवा : सोसायटीचे पालकमंत्र्यांना साकडे

पुढारी वृत्तसेवा

Loan waiver stalled; banks press for recovery

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही योजनेचा लाभ मिळालेला नाही. शासनाने कर्जमाफीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करूनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे बँकांकडून थकबाकी वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत वसुलीची कारवाई थांबवावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी सातारा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोसायटीचे अध्यक्ष सोमनाथ शिराणे यांनी दिलेल्या निवेदनात योजनेच्या अंमलबजावणीतील विलंबाकडे लक्ष वेधले आहे. शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी निर्णय घेऊन कर्जमाफीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, निर्णय होऊनही प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे शासनाकडून कर्जमाफीची घोषणा आणि निधीची तरतूद करण्यात आली असताना दुसरीकडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच वसुली प्राधिकरणामार्फत थकबाकी वसुली सुरू करण्यात आली आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळण्याऐवजी वसुलीच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. शासनाने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून राखीव निधी उपलब्ध करावा.

पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम वर्ग होईपर्यंत संबंधित सोसायट्यांवरील वसुलीची कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT