Lightning Accident
वरठाण : झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाल्याची घटना सोयगाव तालुक्यातील वाकडी शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.
दुपारी अचानक दोन वाजता विजांचा कडकडाट सुरू झाला. तालुक्यातील आबा भिका चौधरी (रा गोंदेगाव) यांच्या शेतामध्ये अचानक वीज कोसळली. यामध्ये त्यांची दोन्ही बैल ठार झाली. दरम्यान महसूल व पशुसंवर्धन विभागाने सायंकाळी सहा वाजता घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेत शेतकरी आबा भिका चौधरी यांचे एक लाख पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.