Crime News : जमिनीच्या वादातून मेव्हण्यावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : जमिनीच्या वादातून मेव्हण्यावर तलवार, कोयत्याने प्राणघातक हल्ला

माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दडसह पाच जणांवर गुन्हा दाखल. गेवराईच्या गोपत पिंपळगावमधील थरार.

पुढारी वृत्तसेवा

Lethal attack on brother-in-law with a sword and a machete, stemming from a land dispute

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा : अर्दड साहेबांनी तू जिवंत नाही छत्रपती संभाजीनगर/बीड, पुढारी आला तर त्याला याच ठिकाणी जिवंत मारून टाका व डेडबॉडी बाहेर घेऊन या, असे म्हणून पाठवले आहे, अशी धमकी देत छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांच्यासह पाच गुंडानी मेहुण्यावर घरात घुसून तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. जमिनीच्या वादातून मंगळवारी (दि. १३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील गोपत पिंपळगाव येथे हा रक्तरंजित थरार घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेहुण्यावर छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयाच्या उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, नितीन पवार, सुधाकर अर्दड, राहुल काळे आणि दत्ता तौर या पाच जणांविरुद्ध तलवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीकांत रतनराव तौर (५३, रा. गोपत पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड; सध्या रा. तिरुमला अपार्टमेंट, नाथ प्रांगण, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

श्रीकांत तौर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वडिलांचे महिन्याभरापूर्वी निधन झाल्याने ते सध्या पत्नी व मुलासह मूळ गावी गोपत पिंपळगाव येथे राहून शेती करत आहेत. त्यांचे दाजी मधुकर अर्दड हे छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त असताना त्यांच्या गावाकडील शेती व इतर सर्व आर्थिक व्यवहार श्रीकांत तौरच पाहत होते.

दोन वर्षांपूर्वी अर्दड सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या नावावर असलेली सर्व मालमत्ता तौर यांनी त्यांच्या नावे परत केली. मात्र, तरीही अर्दड यांनी तौर यांच्या वडिलोपार्जित व कष्टाने घेतलेल्या मालमत्तेवर दावे लावले. यापूर्वीही त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ले केल्याने तलवाडा व घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले होते.

घराची लाईट बंद करून तलवारीने वार

१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास श्रीकांत तौर व त्यांची पत्नी घरात असताना, घरासमोर माजी विभागीय आयुक्त मधुकर अर्दड चारचाकी गाडी घेऊन आले. गाडीतून चार ते पाच जण घरात घुसले आणि तू बाहेर ये, अर्दड साहेब गाडीत बसले आहेत, तुला बोलावले आहे, असे म्हणाले. तौर यांनी बाहेर येण्यास नकार देताच आरोपींनी त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण सुरू केली. या दरम्यान नितीन पवार याने घरातील लाईट बंद केली. अंधारात सुधाकर अर्दड ने तौर यांचे दोन्ही हात पकडले, तर राहुल काळेने तलवारीने तौर यांच्या उजव्या हातावर सपासप वार केले. त्यानंतर दत्ता तौर याने डोक्यात धारदार कोयत्याने प्रहार करून गंभीर जखमी केले. अर्दड साहेबांनी जिवंत मारून डेडबॉडी आणायला सांगितली आहे, असे ओरडत आरोपी वार करत होते. तर नितीन पवारने तौर यांच्या पत्नीचा गळा दाबून चाकू दाखवत, ओरडू नकोस, आज फक्त श्रीकांतला मारण्यास सांगितले आहे, नाहीतर तुलाही मारून टाकू, अशी धमकी दिली.

गावकऱ्यांनी एका आरोपीला पकडले; चौघे पसार

आरडाओरड ऐकून मागच्या वाड्यातून तौर यांचा मुलगा श्रीराज आणि पुतण्या प्रतीक धावत आले. आरडाओरड झाल्याने गावकरी जमा झाले. यावेळी आरोपी पळून जात असताना दत्ता तौर हा पाय घसरून खाली पडल्याने गावकऱ्यांनी त्याला जागीच पकडून ठेवले. मात्र, उर्वरित आरोपी रस्त्यावर थांबलेल्या मधुकर अर्दडच्या चारचाकी गाडीत बसून पसार झाले. पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT