अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Kannad illegal sand transport : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

40 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : शहरातील चंद्रलोक नगरी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा शहर पोलिसांनी मध्यरात्री पकडला. हायावासह तब्बल 40 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या नाईट राऊंड पथकाने सापळा रचून हायवा (एमएच-20 एफएस-8901) ताब्यात घेतला. चौकशीदरम्यान मोबीन राजू शेख, अकील शकील पठाण व प्रविण अशोक दौंड हे विनापरवाना वाळू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत अंदाजे 40 लाख रुपयांचा हायवा तसेच 30 हजार रुपयांची तीन बास वाळू असा एकूण 40 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस नाईक अमोल गायकवाड तसेच पोलिस अंमलदार सतीश नरवडे, विजय चौधरी आणि नामदेव धोंडकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ सुकेशनी कांबळे करीत आहेत.

दरम्यान शहरासह परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून कारवाई तीव करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

याचबरोबर, तालुक्यातील ग््राामीण भागातही हायवा वाहनांद्वारे वाळू, माती व मुरूम यांसारख्या गौण खनिजांची अवैध वाहतूक बोकाळल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः रविवारी व सुटीच्या दिवशी अशा वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे.

महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाया थंडावल्याने ओव्हरलोड हायव्यांमुळे ग््राामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT