शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करताना डॉ अण्णा शिंदे यांच्यासह शेतकरी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Kannad farmers protest : शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन स्थगित

कन्नड ः मका देयक वाटपासह विविध प्रश्नांवर लेखी आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेले शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन 31 मार्चपर्यंत तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून लेखी आश्वासने मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि2) सकाळी संर्घष समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात करण्यात आली होती. देवगाव (रं) येथील 10 एम.व्ही.ए. क्षमतेचा डी.पी. 15 मार्चपर्यंत सुरू करण्यात येईल, असे महावितरण विभागाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे. तसेच औराळा 33 के.व्ही. केंद्रातील 10 एम.व्ही.ए. डी.पी.चे काम सुरू करण्यात आले असून ते 28 मार्चपर्यंत कार्यान्वित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी मका खरेदी केंद्रास नव्याने उद्दिष्ट उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार 3 मार्चपासून मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून या आठवड्यात खरेदी केलेल्या मक्याचे देयक अदा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

संबंधित विभागांकडून प्राप्त लेखी पत्रांच्या आधारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत प्रश्न पूर्णपणे न सुटल्यास 1 एप्रिलपासून पुन्हा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्याकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT