नोकरीचे आमिष : महिला बँक कर्मचाऱ्याला २६ लाखांचा गंडा file photo
छत्रपती संभाजीनगर

नोकरीचे आमिष : महिला बँक कर्मचाऱ्याला २६ लाखांचा गंडा

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) नावे पार्टटाईम नोकरी व जादा उत्पन्नाच्या आमिषाने नामांकित बँकेतील महिला कर्मचाऱ्याला जाळ्यात ओढत फसवणूक केली.

पुढारी वृत्तसेवा

Job lure: Female bank employee duped of Rs 26 lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) नावे पार्टटाईम नोकरी व जादा उत्पन्नाच्या आमिषाने नामांकित बँकेतील महिला कर्मचाऱ्याला जाळ्यात ओढत सायबर भामट्यांनी तब्बल २६ लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान एन-११ सुदर्शन नगरात घडला.

एन-११, सुदर्शननगर, टीव्ही सेंटर, हडको परिसरात राहणाऱ्या दीपाली विजय कोलते (२८) या एका बँकेत मॅनेजर आहेत. २४ नोव्हेंबर रोजी कोलते यांच्या व्हॉट्सअॅपवर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एचआर विभागाच्या नावाने मॅसेज आला. त्यात टेलिग्राम अॅपसवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. टेलिग्रामवर रंजिता विजयवर्गीया या नावाच्या अकाऊंटवरून पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली.

टास्क, कमिशनचे आमिष जॉबपूर्वी काही टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना तत्काळ कमिशनही देण्यात आले. असे दोन टास्क पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या टास्कला ८०० रुपये भरल्यास ३० टक्के कमिशन मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर गोल्ड परचेस ट्रेडिंगचे टास्क देण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर अपेक्षा पांडे या नावाच्या अकाऊंटवरून सेटलमेंट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. काही रक्कम परत मिळाल्याने कोलते यांचा विश्वास वाढला.

टास्क चुकला, सिस्टम एरर

टास्कच्या नावाखाली १ हजार ते ५० हजारांपर्यंतची मागणी सुरू झाली. टास्क चुकला, सिस्टम एरर झाली, ग्रुपमधील इतर मेंबरमुळे अडचण आली अशी कारणे देत पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. विश्वासासाठी इतर सदस्यांकडूनही रक्कम भरल्याचे दाखवण्यात आले. दरम्यान टास्क पूर्ण करूनही पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे कोलतेच्या लक्षात आले. याचवेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

२६ लाख ७३ हजारांची फसवणूक

२४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सायबर भामट्यांनी कोलतेची २६ लाख ७३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर सायबर भामट्यांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास निरीक्षक अतुल येरमे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT