Crime News : बंदुकीचा धाक दाखवत वीस लाखांचे दागिने लुटले Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : बंदुकीचा धाक दाखवत वीस लाखांचे दागिने लुटले

खुल्लोड घाटातील घटना; अडीच लाख लंपास, व्यावसायिक गंभीर

पुढारी वृत्तसेवा

Jewelry worth ₹20 lakh looted at gunpoint

उंडणगाव, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवर जाणाऱ्या सराफा व्यावसायिकाकडील वीस लाखांचे सोन्याचे दागिने व अडीच लाखांची रोकड बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील ० रोडवर खुल्लोड घाटात बुधवारी (दि.२०) रात्री आठ वाजेदरम्यान ही घटना घडली. या घटनेत सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.

नितीन सोनाजी निकम (३०, रा. पालोद, ता. सिल्लोड) यांचे अंबई येथे बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते दररोज पालोद ते अंभई असा दुचाकीवरून प्रवास करतात.

बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे जात होते. उंडणगाव अंभई रोडवरील खुल्लोड घाटात निर्जन भागात दोन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एका चोरट्याने बंदुकीचा धाक दाखवला, तर दुसऱ्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र नितीन निकम यांनी बॅग सोडण्यास विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटावर व हातावर वार करण्यात आले. चोरट्यांनी बॅगेचे बंद कापून त्यातील सुमारे वीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेनंतर जखमी अवस्थेत नितीन निकम यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

पाळत ठेवल्याचा संशय

व्यावसायिक नितीन निकम यांच्यावर चोरट्यांनी पाळत ठेवल्याचा संशय आहे. त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळेची रेकी केली असण्याचा संशय आहे. चोरटे निर्जन भाग बघून त्यांच्या मार्गावर दबा धरून बसले होते. यातूनच चोरट्यांना हे दागिने व रोकड लंपास करून पळ काढण्यास वेळ मिळाल्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT