Jewelry was stolen from a woman's purse while she was boarding the bus.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्सूल टी पॉइंट येथून जळगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा सुमारे ६१ हजारांचा ऐवज पळवला. ही घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हर्सल टी पॉइंट येथे घडली.
पिसादेवी रोडवरील राजे संभाजीनगरात राहणाऱ्या वर्षा भरत पाटील (४५) या आपल्या दोन मुलींसह देवदर्शनासाठी मोयगाव येथे जाण्यासाठी हसूल टी पॉइंट बस थांब्यावरून जळगावकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्या होत्या. बसमध्ये चढताना चोरट्याने त्यांच्या पर्समधील ६० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनी सोन्याचे मंगळसूत्र व १ हजारांची रोख रक्कम चोरून नेली.
बसमध्ये तिकीट काढण्यासाठी पर्स उघडून पाहिली असता पर्सची चैन उघडी तसचे पर्स मधील पैसे व मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर त्यांनी बसमधील प्रवासी व आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी करून शोध घेतला, मात्र काहीही मिळून आले नाही. पाटील यांच्या तक्रारीवरून हसूल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सय्यद करीत आहेत.