Jayakwadi Dam @ 76 percent, water will be released to Majalgaon when the stock is 80 percent
पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वरील धरणांतून पाण्याची आवक जमा झाल्यामुळे रविवारी (दि.१३) सायंकाळी सहा वाजता नाथसागर धरण ७६ टक्के भरले आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्याने जायकवाडीत पाण्याची आवक कमी झाली आहे. रविवारी सायंकाळी या धरणात ७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची नोंद येथील नाथसागर धरण नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
९ हजार ४८२ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे. दरम्यान, धरणात ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यास माजलगाव धरणात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेण्याची शक्यता आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खरडकर यांनी वरिष्ठ विभागाकडून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग करावा लागणार यासाठी आपले पथक तयार ठेवले आहे.